अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीव्र दुष्काळामुळे दिवाळीचा उत्साह मंदावला असताना पुण्याच्या आनंद यात्री मित्र मंडळाने टंचाईग्रस्त भागात फराळ वाटप केले. पगारे वस्ती, मातंग वस्ती, माणिकदौंडी परिसर आणि रांजणी येथील भिल्ल वस्तीत हे वाटप झाले. सदस्य नितीन अदवंत यांनी मंडळासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पाथर्डीतील दुष्काळग्रस्तांना दिवाळी फराळाचे वाटप
Source: Prahaar