मुंबईतील लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५७ पात्र रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या मिळाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चावी व ताबा पत्रे वितरित करण्यात आली. आशियातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प म्हाडामार्फत राबवला जात असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून हद्दपार होऊ दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बीडीडी चाळ पुनर्विकास: ५५७ कुटुंबांना चाव्या
Source: Prahaar