मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना टप्पा दोनअंतर्गत १४० सफाई कर्मचाऱ्यांना नव्या घरांच्या चाव्या देण्यात आल्या. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आधी १५० चौरस फूटांची घरे मिळत होती, आता ३०० चौरस फूटांची प्रशस्त घरे दिली जात आहेत. पुढील टप्प्यात सुमारे ५०० ते ५५० घरे देण्याचे नियोजन आहे.
मुंबईत १४० सफाई कर्मचाऱ्यांना नव्या घरांच्या चाव्या
Source: Prahaar