राज्यातील पावसाची तूट आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गायरान व वैयक्तिक जमिनींवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला अधिकृत मान्यता दिली आहे. ही कामे महाराष्ट्र रोजगार हमी-विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत राबवली जाणार असून सामुदायिक व वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवरील लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
चारा टंचाईसाठी गायरानात अतिरिक्त चारा लागवडीला मान्यता
Source: Prahaar