दीपावलीच्या पूर्वसंध्येला गोव्यात आज सर्वत्र नरकासुरांच्या अवाढव्य प्रतिमा उभारण्यात आल्या असून रात्रभर गोंधळ व धुमाकूळ सुरू राहणार आहे. निवडणूक वर्षामुळे राजकीय नेत्यांच्या भरघोस आर्थिक मदतीमुळे यंदा प्रतिमांची संख्या व उंची वाढली आहे. उद्या पहाटे साधारणतः पाचच्या सुमारास बहुतांश ठिकाणी प्रतिमांचे दहन होईल. पणजीत वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.
गोव्यात आज नरकासुरांचे राज्य; प्रतिमांची संख्या वाढली
Source: Tarun Bharat