नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात पोहण्यास गेलेले अनिल भागुजी भदादे (49) आणि तुकाराम दामू येले (47) गुरुवारपासून बेपत्ता आहेत. धरणाच्या काठावर त्यांचे कपडे व वैयक्तिक वस्तू आढळल्याने ते पाण्यात बुडाल्याची शक्यता आहे. पोलीस, स्थानिक नागरिक व पाणबुड्यांनी शुक्रवारी दिवसभर शोधमोहीम राबवली, मात्र अंधारामुळे ती थांबवावी लागली.
इगतपुरीत मुकणे धरणात पोहण्यास गेलेले दोघे बेपत्ता
Source: Prahaar