मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील कुकरजा पॅलेस इमारतीच्या २३व्या मजल्यावर ६ नोव्हेंबर रोजी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने लेव्हल-२ घोषित करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली. या घटनेत तिघे जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे.
घाटकोपरमध्ये इमारतीच्या २३व्या मजल्यावर आग; तिघे जखमी
Source: Prahaar