एसटी प्रवासातील सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्ड नसतानाही महिलांना सवलतीचा लाभ मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांचे वितरण झाले असून, ग्रामीण भागातील नोंदणी अपूर्ण असल्याने ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.
महिलांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्यतेला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ
Source: Deshdoot