नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या शिखर परिषदेत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाला. केंद्रीय मूल्यांकन आराखड्यात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरा क्रमांक पटकावला असून, 2030 पर्यंत 500 गिगावॅटच्या राष्ट्रीय उद्दिष्टात राज्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मंत्रालयाने नमूद केले.
नवीकरणीय ऊर्जेत महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार
Source: Prahaar