मुंबईतील कुलाबा येथील पंचशील नगरमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना नव्याने बांधलेल्या सेवा निवासस्थानांच्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत ही घरे देण्यात आली. २०२८ पर्यंत सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
कुलाब्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना नव्या घरांच्या चाव्या
Source: Prahaar