मुंब्रा येथे वीस दिवसांच्या बाळाची अडीच लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. बाळाची रत्नागिरी येथून सुखरूप सुटका करून ते डोंबिवलीतील संस्थेत पालनपोषणासाठी ठेवण्यात आले आहे. आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आणखी बाळांची खरेदी-विक्री झाली का, याचा तपास सुरू आहे.
मुंब्रा येथे २० दिवसांच्या बाळाची विक्री; दहा जणांना अटक
Source: Pudhari