धाराशिवच्या कळंब तालुक्यात प्रेमप्रकरणातून तरुणीचे अपहरण झाले. आरोपी अभिजित नवाट व त्याच्या साथीदारांनी तरुणीच्या आई-बहिणीवर हल्ला करून तिला एर्टिगा कारमध्ये जबरदस्तीने नेले. अंबाजोगाईत पोलिसांनी कार अडवली; आरोपीने कोयत्याने धमकी दिली. पोलीस कर्मचारी गणेश वाघमोडे जखमी होऊनही तरुणीची सुटका केली. मुख्य आरोपी अटकेत, तीन फरार.
धाराशिवमध्ये प्रेयसीचे अपहरण; पोलिसांनी सुखरूप सोडवले
Source: Mumbai Tak