महाराष्ट्रातील ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने पुण्याचा भूलतज्ज्ञ डॉ. अदनानअली सरकार याला दोषी ठरवले आहे. त्याने गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्याला सहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 65 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ISIS ची विचारसरणी व प्रचारात्मक मासिके प्रसारित करण्यात तो सहभागी होता. उर्वरित पाच आरोपींवरील खटला सुरू आहे.
पुण्याच्या डॉक्टरला ISIS प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा
Source: Sarkarnama