संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १९३ एकर वनजमिनीच्या प्रकरणात सरकारने दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. १,०५३ एकर जमीन वन विभागाच्या नावे करण्यात आली, मात्र १९३ एकर प्रकरणात कायदेशीर लढाई न दिल्याने जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात गेली. या प्रकरणाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वनजमीन प्रकरणी शरद पवार गटाचा सरकारवर हल्लाबोल
Source: Sarkarnama