महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि सलग सुट्ट्यांमुळे वेतन वेळेत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंता होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त विभागाशी पाठपुरावा करून हा निर्णय मिळवला.
एसटी कर्मचाऱ्यांचा जुलैचा पगार 11 ऑगस्टला जमा होणार
Source: Maharashtra Times