शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती.
शिवसेना नाव-चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Source: Mumbai Tak