राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत, अशा २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. यामुळे त्यांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सातबारावर नाव नसलेल्या २.३१ लाख शेतकऱ्यांचा रेकॉर्डवर समावेश
Source: Prahaar