मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था आणि पडताळणीसाठी वेळ मिळावा, तसेच शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या बैठकीत या नियमाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम: परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजर राहणे बंधनकारक
Source: Prahaar