छत्तीसगडमधील बिरजू पुंगाटी यांच्यावरील नक्षलवादाच्या सर्व 50 खटल्यांतून निर्दोष मुक्तता झाली. मात्र, 2012 मध्ये अटक झाल्यापासून 13 वर्षे ते तुरुंगात होते. पुराव्याअभावी सर्व खटले संपुष्टात आले, पण या काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि पत्नीलाही तुरुंगवास भोगावा लागला.
बिरजू पुंगाटी 50 केसेसमधून निर्दोष, 13 वर्षे तुरुंगवास
Source: BBC Marathi