मुलांच्या डब्यात पोळी-भाजी, पराठा, पोहे, उपमा, इडली यांसारखे घरगुती पदार्थ द्यावेत. डाळी, चणे, मूग, मटकी, पनीर, अंडी आणि दही यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ, हंगामी फळे आणि वयानुसार सुका मेवा समाविष्ट करावा. जास्त साखर, मीठ, तेल आणि पॅकेज्ड स्नॅक्स टाळावेत. डबा आकर्षक ठेवल्यास मुले आवडीने खातात.
मुलांच्या डब्यात पौष्टिक आणि संतुलित आहार आवश्यक
Source: Lokshahi Marathi