महाराष्ट्रात सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषदेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, नोंदणीसाठी केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांची अधिसूचना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. परिषदेअंतर्गत चार स्वायत्त मंडळे स्थापन होणार असून, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ यांसह ५० हून अधिक विषयांमध्ये प्रशिक्षण सुरू होणार आहे.
आरोग्यसेवा शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम यंदापासून लागू
Source: Prahaar