मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे ते पांजरापूर जलबोगदा प्रकल्पाला राज्य शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने २१ सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय जारी केला. सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे जुन्या जलवाहिन्यांवरील ताण कमी होईल. पर्यावरणीय व सुरक्षिततेच्या अटींसह सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेवर राहणार आहे.
पिसे-पांजरापूर जलबोगद्याला राज्याची पूर्वमंजुरी
Source: Prahaar