माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात पावसाअभावी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांसमोरच त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून पंचनाम्याची वाट न पाहता सरसकट मदत देण्याची मागणी केली. भरणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा सल्ला दिला. या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवनीत राणांचा कृषिमंत्र्यांना फोन, शेतकऱ्यांना मदतीची मागणी
Source: Lokshahi Marathi