कुडचडे मतदारसंघातील भाजप उमेदवारीवरून आमदार नीलेश काब्राल यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या बॅनरवर स्थानिक आमदाराचा फोटो वगळल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच उमेदवारी नाकारल्यास कुडचडेची जनता सांगेल तो निर्णय घेईन, असे काब्राल म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी २०२७ मधील पक्षांतराची तयारी भाजप करत असल्याचा आरोप केला.
कुडचडे उमेदवारीवरून काब्राल पुन्हा आक्रमक
Source: Pudhari