महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने कृषी विभागाचा आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले असले, तरी शेतकरी सेवा बंद केलेल्या नाहीत. पंचनामे, कीड-रोग नियंत्रण, पीकविमा व शासकीय योजनांची कामे सुरूच असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या सर्वसमावेशक समितीमार्फत नवीन आकृतिबंध तयार करावा, अशी महासंघाची मागणी आहे.
कृषी आकृतिबंध रद्द करण्याची मागणी; शेतकरी सेवा सुरूच
Source: Agrowon