राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय ऑक्टोबरमध्ये घेतला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन पर्जन्यमान, पीक नुकसानीचे प्रमाण आदी निकषांवर होणार असून खरीप हंगामातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. दरम्यान, शरद पवार २८ सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
दुष्काळ निर्णय ऑक्टोबरमध्ये; शरद पवारांचा २८ सप्टेंबरपासून दौरा
Source: Agrowon